साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

साहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरण

0
फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर...
_Gahurani_1.jpg

गहुराणी – अनुभवरूपी हिऱ्यामोत्यांची माळ

कांचन प्रकाश संगीत ह्यांचा ‘गहुराणी’ हा ललितकथा संग्रह त्यांच्या लेखनाचे वेगळेपण जपतो. त्यांचे यापूर्वी ‘अन्वयार्थ’ आणि ‘हरितायन’ हे संग्रह त्याच प्रकारचे म्हणून प्रसिद्ध आहेत....
-smrutichitre-coverpage

स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक (Smrutichitre – Laxmibai Tilak)

रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने - लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या...

बलुतं – एक दु:खानं गदगदलेलं झाड!

‌मनुष्यसमाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दु:खांनी गदगदलेल्या दगडू मारुती पवार नावाच्या माणसाची ‘बलुतं’ ही एक आत्मकथा आहे. महार जातीच्या आई-वडिलांपोटी...
_Asiatic_Society_1.jpg

पांढऱ्या रंगाचा दरारा – एशियाटिक आणि इतर वास्तू

प्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. रंगाच्या स्वभाववैशिष्ट्यातून इमारती नकळतपणे पाहणाऱ्याशी संवाद साधत असतात. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या इमारतीचे सौंदर्य तिचा पांढरा रंग खुलवतो. तो रंग...
_VinayakdadaPatil_GeleLihaycheRahun_1.jpg

गेले लिहायचे राहून – विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा

‘गेले लिहायचे राहून’ हे विनायकदादा पाटील यांच्या ललित लेखनाचे पुस्तक. ते लेखन प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे...
_VamanChordhadeYanchiKatha_TajiAaniSamkalin_1.jpg

वामन चोरघडे यांची कथा – ताजी आणि समकालीन

पूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ती कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या...

सखा कलाल – एका कथाकाराची अखेर

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...

पियूची वही : गोष्टीमागची गोष्ट… (Piyu’s journal: The story behind a story...

आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल...
_dhanajay-chincholikar

बब्रूवान रुद्रकंठावार (Babruvan Rudrakanthawar)

0
बब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले; त्याचे कारण म्हणजे त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. त्यांचे चिंचोली -...