अचला जोशी

हौसेनं केलेलं काम हा विरंगुळाच असतो – अचला जोशी

     ‘‘पूर्वीच्‍या एकत्रपणे नांदत्‍या घरांप्रमाणे आपलं आजचंही आयुष्‍य नांदतं असायला हवं. त्‍यामध्‍ये मित्रपरिवार, दूर-जवळचे नातेवाईक, प्रतिभावंत, व्‍यावसायिक अशांची सतत ये-जा असली म्‍हणजे आपल्‍याला...

डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...