भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)
भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...
थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन
लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...
फलटणचा संस्कृतिशोध !
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...
‘जीवना’सह सहजीवन
माधव आत्माराम चितळे हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत. त्यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. विजया चितळे (आशा पटवर्धन) यांच्या सहजीवनाबद्दल अपर्णा चितळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...
माझ्या आयुष्याचा अर्थ – दिनकर गांगल यांची मुलाखत
‘थिंक महाराष्ट्र’चे प्रवर्तक दिनकर गांगल एका वेगळ्याच तऱ्हेने 26 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रकटत आहेत. गांगल यांची प्रकट मुलाखत ‘चैत्रचाहूल’ उपक्रमाने त्यांच्या ‘गंभीर व...
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून...
विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?
उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने...
मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर
‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.
अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
मूकनायकची शताब्दी (Mooknayak)
‘मूकनायक’ हे बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी चालवलेले मराठी भाषेतील पाक्षिक होते. ‘मूकनायक’चा पहिला अंक 31 जानेवारी 1920...
चकोते समुहाचा प्रयोग सेंद्रीय शेतीचा
अण्णासाहेब चकोते यांनी महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरील मानकापूर येथे पन्नास एकर क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यांची ‘गणेश बेकरी’ यशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी...