यशवंत मराठे
कोरोना: मोदी-ठाकरे यांनी काय करावे? (Protagoras Paradox And Corona)
प्रोटागोरस पॅराडॉक्स (पॅराडॉक्स = विरोधाभास) ही एक प्रसिद्ध ग्रीक आख्यायिका आहे. प्रोटागोरस हा वकील आणि त्याचा विद्यार्थी युथलॉस यांच्यातील न्यायालयीन लढ्याची ही कथा. न्यायालयातील तो एक कठीण पेचप्रसंग किंवा कॅच-22 परिस्थिती आहे. प्रोटागोरस नावाचा प्रसिद्ध वकील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीस देशात होता.