Home Authors Posts by सुरेश लोटलीकर- वामन देशपांडे

सुरेश लोटलीकर- वामन देशपांडे

40 POSTS 0 COMMENTS
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत. वामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची 109 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

एकविसावे साहित्य संमेलन (Twenty First Marathi Literary Meet- 1935)

इंदूर येथे भरलेल्या एकविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष औंध संस्थानचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी होते. ते विद्याव्यासंगी होतेच, पण कलांचेही भोक्ते होते. त्यांनीच महात्मा गांधी यांच्या सल्ल्याने त्यांच्या संस्थानात पहिली रयतसभा स्थापन केली...

विसावे साहित्य संमेलन (Twentyth Marathi Literary Meet 1934)

साव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर हे होते. संमेलन बडोदे येथे 1934 साली भरले होते. त्या संमेलनातच कृष्णराव मराठे यांनी अश्लीलतेविरुद्धचा ठराव आणला होता.

एकोणिसावे साहित्य संमेलन – Nineteenth Marathi Literary Meet 1933)

एकोणिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे होते. ते संमेलन नागपूर येथे 1933 साली भरले होते. खाडिलकर यांची ख्याती थोर नाटककार, झुंझार पत्रकार आणि लोकमान्य टिळक यांचे अनुयायी व देशभक्त अशी होती.

अठरावे साहित्य संमेलन (Eighteenth Marathi Literary Meet 1932)

अठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. ते संमेलन कोल्हापूर येथे 1932 साली भरले होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत !

सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...

सोळावे साहित्यसंमेलन (Sixteenth Marathi Literary Meet – 1930)

मडगाव (गोवे) येथे भरलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘रागिणी’कार वामन मल्हार जोशी. कादंबरीकार वि.स.खांडेकर यांनी वामन मल्हार यांचा ‘नैतिक उंचीचा आदर्श’ असा उल्लेख केला होता. वामन मल्हार यांचे सर्व साहित्य हे सजीव ध्येयवादाने भारलेले आणि विचारांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतून नवी स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे...

पंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)

बेळगाव येथे भरलेल्या पंधराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे हे होते. ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील आघाडीचे वक्ते, तरुण पिढीला आकर्षित करणारी लेखनशैली असलेले स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होते.

चौदावे साहित्य संमेलन (Fourteenth Marathi Literary Meet 1928)

ग्वाल्हेर येथे भरलेल्या चौदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य हे स्वत: पुणे येथे 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. माधव श्रीहरी अणे यांनी विशेष कोठल्याही प्रकारचे लेखन केलेले नाही.

तेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)

तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते मराठीतील विनोदी वाङ्मयाचे आद्यप्रवर्तक होत. ‘सुदाम्याचे पोहे’हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता.

बारावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1926)

बारावे साहित्य संमेलन मुंबई येथे 1926 साली साजरे झाले. ते अकराव्या संमेलनानंतर पाच वर्षांनी भरले होते. त्याचे अध्यक्ष सरदार माधवराव विनायकराव किबे होते. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासारखा चतुरस्र अध्यक्ष झाल्यावर पुढील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किमान उत्तम साहित्यिक असावा अशी अपेक्षा होती. पण सरदार किबे यांचे नाव साहित्य क्षेत्रात त्या तोडीचे मानले गेले नाही.