वृषाली मगदूम या स्त्री मुक्ती संघटनेच्या संघटक आहेत. त्या कचरावेचक महिलांसाथी कार्यरत आहेत. त्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या राज्य समितीच्या सदस्य आहेत. तसेच, अन्नपूर्णा परिवाराच्या विश्वस्तही आहेत. त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. जागतिक पातळीवर तो व्यायामाचा प्रकार म्हणून लोकप्रिय होत आहे. योग दिन (21 जून) हा जगातल्या अनेक देशांमध्ये साजरा होतो. भारताने जगाला दिलेल्या महत्त्वाच्या देणग्यांपैकी योग ही एक देणगी आहे. मात्र ही देणगी भारताला दिली आहे ती पतंजली या इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या मुनींनी. योगाचे मूळ काय आहे आणि पतंजलींनी त्याचा अभ्यास करण्याची सांगितलेली पद्धत याचा सोप्या भाषेत परिचय करून देत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम...
महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांच्या नावांमध्ये ‘अन्नपूर्णा परिवारा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही संस्था गरीब आणि गरजू महिलांच्या सक्षमीकरणाविषयी समग्र विचार करते. व्यवसाय, आरोग्य, कुटुंबाचा विकास, आरोग्य, निवृत्तीवेतन अशा अनेक आघाड्यांवर भक्कमपणे महिलांच्या पाठीशी उभी रहाणारी संस्था अशी अन्नपूर्णा परिवाराची ओळख आहे. आजमितीला सव्वा लाख शेअर होल्डर्स, बचत करणाऱ्या महिला आणि तीनशे पन्नास कर्मचारी वर्ग असलेल्या या संस्थेची माहिती सांगत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम...