विशाखा पोफळी यांचा जन्म (26 ऑक्टोबर 1950) आकोटचा. त्यांचे शिक्षण बी ए (मराठी) झाले आहे. त्यांचा गृहिणी म्हणून कामांचा झपाटा और आहे. त्यांच्या विविध आवडी – लेखन-वाचन, शब्दकोडी सोडवणे अशा आहेत.
आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...