विनायक बाळ
पाजपंढरीची समस्या अपंगांची (Dapoli village faces a problem of handicapped generation)
एका छोट्याशा, चार हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग आहेत हे वाचून नवल वाटेल ! पण तसे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहे. त्याचे नाव आहे पाजपंढरी. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले. त्यांना ही प्रेरणा संतोष शिर्के नावाच्या दापोलीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली...
मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)
गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...
दापोलीच्या रेखा बागूल – कर्णबधिरांना आसरा ! (Rekha Bagul works mainly for deaf children...
रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे...
मुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय
शाळेतील शिक्षक वंदनीय असतात; पण एखाद्या शाळेतील विद्यार्थीही वंदनीय असतात हे वाचून कोणालाही अचंबा वाटेल. अशी शाळा आहे दापोली तालुक्यातील ‘मुरूड’ या गावातील.शाळा 10 ऑगस्ट 1834 रोजी स्थापन झाली. शाळेत 1842 पासूनचे बरेचसे रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यानुसार शाळेचा पहिला विद्यार्थी ‘विनू दातार’ हा आहे. त्यावेळी वडिलांचे नाव लिहीत नसावेत. एवढेच नव्हे, तर नोंद घरगुती नावानेच होत असे. 1844 पासून संपूर्ण नाव, तर 1879 पासून जन्मतारखाही नोंद करू लागले...
ओळगावला ओढ ऐक्याची आणि विकासाची
ओळगावचे वयोवृद्ध आजोबा लक्ष्मण मांजरेकर खूष आहेत, कारण गेली चाळीसेक वर्षे गावात दारूबंदी आहे. त्यामुळे तक्रारींचं आणि भांडणांचं प्रमाण जवळपास नाहीसं झालं आहे. गावात कमालीची शांतता आहे.” ओळगावात दारूबंदीने आणि ग्रामस्थांच्या एकीने तेथे मोठी क्रांती घडवली आहे. दापोली तालुक्यातील ओळगाव रस्त्यापासून थोडे आत झाडीत लपलेले आहे. तेथे ऊसाची शेती केली जाई...
मुरुडकरांची भाषा !
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...
आसूद गावची पुरातन पाणी वाटप व्यवस्था
आसूद हे गाव डोंगरउतारावर आहे. त्या गावच्या भगिरथ-पुत्रांनी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून ‘गंगा अंगणी’ आणली ! त्यामुळे गावात अष्टौप्रहर पाणीच पाणी झाले. ती अनोखी पाणी वाटप योजना तीनशे वर्षे चालू आहे. त्या पुरातन पाणी वाटप व्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही. पाण्यावरून कोणी वाद करत नाहीत. कारण ती गोष्ट न्याय्य पद्धतीने चालवली जाते…
गंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी
कोळबांद्रे या खेडेगावातील बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने वाडीच्या पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले ते प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने ! वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाणी वाडीत आले ! वाडीच्या या प्रयत्नांना ‘शिवतरुण मित्र मंडळ’ कारणीभूत ठरले...
मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा
मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...