2 POSTS
विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी लांजा येथे बत्तीस वर्षे रोगनिदान करण्यासाठी लॅबोरेटरी चालवली. त्यांनी ‘मराठी साहित्यातील वडार समाजजीवनाचे चित्रण’ या विषयावर बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठातून पीएच डी केली आहे. त्यांची ‘अजि म्या परदेस पाहिला’ हे प्रवासवर्णनपर व ‘अशी घडली राजस्विनी’ ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या दिवाळी अंकांतून लेखन करतात. त्यांच्या बेळगावी बोलीभाषेत पाच कथा व बारा शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.