Home Authors Posts by विदुर महाजन

विदुर महाजन

2 POSTS 0 COMMENTS
Member for 12 years विदुर महाजन यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते एम ए ला विद्यापीठात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी स्लिंग फ्लेक्सी कार्टन प्रायव्हेट लिमिटेड या घरच्या व्यवसायात पंचवीस वर्षे व्यवसाय केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या त्यांच्या कृतीला "Red and White Bravery award' मिळाले. त्यांनी 2008 पासून पूर्णवेळ सतार असा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम आणि खेडोपाडी सतार, सतारीच्या माध्यमातून ध्यानधारणा, व्यसनापासून व्यासंगाकडे, सतार आणि 'टकमन'चे नेतृत्व बा प्रणालीवर आधारित विविध प्रकल्पांसाठी देशात आणि देशाबाहेर सुमारे आठशे कार्यक्रम केले. ते लेखक असून त्यांची 'मैत्र जीवाचे', 'शोधयात्रा', 'आनंदयात्रा', ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना नामांकित राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांचे 'ग्रीष्म', 'र' ('स्व'च्या शोधात), गांधार पंचम असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी हार्मनी स्कूल ऑफ सितार या नावाने सतारीची शाळा 2006 मध्ये सुरू केली.

उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...
स्ट्रासबर्गमध्ये विदुर महाजन

एका किटलीची गोष्ट

पॅरिसमधल्या मुख्य कालव्यातल्या एका बोटीत माझा सतारीचा कार्यक्रम  झाला... पॅरिसच्या त्या दौर्यावच्या माझ्या आठवणी अनेक आहेत, पण एक कधीतरी वेड्यासारखं पाहिलेलं स्वप्न, प्रत्यक्षात आणलं गेल्याची...