2 POSTS
Member for 12 years
विदुर महाजन यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते एम ए ला विद्यापीठात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी स्लिंग फ्लेक्सी कार्टन प्रायव्हेट लिमिटेड या घरच्या व्यवसायात पंचवीस वर्षे व्यवसाय केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या त्यांच्या कृतीला "Red and White Bravery award' मिळाले. त्यांनी 2008 पासून पूर्णवेळ सतार असा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम आणि खेडोपाडी सतार, सतारीच्या माध्यमातून ध्यानधारणा, व्यसनापासून व्यासंगाकडे, सतार आणि 'टकमन'चे नेतृत्व बा प्रणालीवर आधारित विविध प्रकल्पांसाठी देशात आणि देशाबाहेर सुमारे आठशे कार्यक्रम केले. ते लेखक असून त्यांची 'मैत्र जीवाचे', 'शोधयात्रा', 'आनंदयात्रा', ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना नामांकित राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांचे 'ग्रीष्म', 'र' ('स्व'च्या शोधात), गांधार पंचम असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी हार्मनी स्कूल ऑफ सितार या नावाने सतारीची शाळा 2006 मध्ये सुरू केली.