1 POSTS
वसंत आजगांवकर हे प्रयोगशील संगीतकार आणि सुरेल गायक म्हणून परिचित आहेत. त्यांनी मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. ते पन्नासहून अधिक वर्षे अभिजात संगीतावर आधारित मराठी/हिंदी भावसंगीताचे कार्यक्रम सादर करत आहेत. त्यांच्या प्रतिभेचा चरित्र गायन ते अभंग व सुगम भावगीत ते आशयसंपन्न मराठी कविता असा विस्तृत आवाका आहे.