Home Authors Posts by वर्षा कुवळेकर

वर्षा कुवळेकर

2 POSTS 0 COMMENTS
वर्षा चंद्रशेखर कुवळेकर याच पूर्वाश्रमीच्या वर्षा मधुकर वाखारकर. त्या मूळ धुळ्याच्या. वडील सरकारी वकील म्हणून अलिबागला आले. पती केंद्र सरकारच्या नोकरीत असल्यामुळे लग्नानंतर वास्तव्य मुंबईत. मात्र परत अलिबाग येथे निवृत्त जीवनानंद. पतीनिधन झाल्यावर हात लिहिता झाला. एकटेपणावर उत्तम मार्ग सापडला. बरेच लेखन झाल्यावर दोन पुस्तके झाली. ‘मागे वळून पाहताना’ आणि ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’. त्या पुस्तकांना सहा पुरस्कार मिळाले आहेत.

माझे अलिबाग

एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग. नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची... म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी... असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब. ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती...

गरूडपाड्याची गावकी (Garudpada model of village based civil society)

मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते. गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत...