1 POSTS
विनायक आदिनाथ बुवा हे विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या लेखनाचा प्रारंभ 1950 मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण दीडशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबर आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे.