उषा रामवाणी- गायकवाड
म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)
म्हण’ या शब्दाची निर्मिती संस्कृतमधील ‘भण’ या धातूचा अपभ्रंश होऊन झाली आहे. म्हण ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’...