1 POSTS
सुहास बहुळकर हे मोठे व्यक्तिचित्रकार म्हणून विख्यात आहेत; तसेच संशोधक-लेखक म्हणूनही. त्यांनी मोठमोठे कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत. त्यांनी कलाशिक्षण ‘जे जे’त घेतले; तेथेच दोन दशके अध्यापनाचे कामही केले. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनात मांडल्या जाणाऱ्या त्यांनी चितारलेल्या दोन चित्ररथांना दोन वर्षे (1981) आणि (1984) सुवर्णपदके प्राप्त झाली होती. त्यांनी चित्रकलेची मोठमोठी म्युरल चित्रांकनांची कामे पार पाडली आहेत. सुहास बहुळकर यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना ‘चतुरंग’चा तीन लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार (2018) लाभला आहे. त्यांची पत्नी साधना याही नियतकालिकांत पस्तीस-चाळीस वर्षांपासून लिहीत आहेत.