सुहास सरदेशमुख
हिंगोली : शेतकऱ्यांच्या मीराई !
हिंगोली येथील मीरा कदम या शिक्षिका स्वत: पायांनी अधू आहेत. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. त्यांना चालताना कशाना कशाचा आधार घ्यावा लागतो; पण त्यांची वृत्ती मात्र आधार देण्याची आहे ! त्यांनी मुख्यत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये म्हणून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची सुरुवात एकोणीस वर्षांपूर्वी झाली. मीरा कदम यांचे वडील वारले, तेव्हा त्यांना वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण होणारी पोकळी जाणवली. त्यांनी पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. त्यांच्या कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला, तेव्हा त्यांनी चाळीसपर्यंत मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे सुरू केले. मीरा यांनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या ‘आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होते, तेव्हा आत्महत्या करू नका’ हे हृदयद्रावक वर्णन करून सांगू लागल्या...
अजिंठा लेणी – ऱ्हासाच्या दिशेने! (Fading Art of Ajintha Caves)
अजिंठा लेणी जगाला 1819 मध्ये माहीत झाली. ती खोदली गेली इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा सहाशे वर्षांत. म्हणजे त्यांचा शोध जवळ जवळ तेराशे वर्षांनी लागला! शोध लागूनही दोनशे वर्षें होऊन गेली आहेत.