1 POSTS
सुभाष पाटील हे विनोबा भावे यांच्या लेखनाने इतके झपाटले, की त्यांनी आठवीच्या वर्गात शाळा सोडली आणि ते तडक पवनार-वर्ध्याच्या ब्रह्मविद्या मंदिर आश्रमात गेले. ते आता बासष्ट वर्षांचे आहेत. ते गावोगाव विनोबा साहित्याचा प्रचार करत फिरत असतात. त्यांनी माधव मेहेंदळे यांच्याबरोबर कुष्ठरोग निवारणाचे कार्य कर्जतजवळच्या आदिवासी पट्ट्यात केले. त्यांनी कर्जत-कशेळी येथे प्रयोगशील एक व दिव्यांग मुलांसाठी एक अशा शाळा उभ्या केल्या; दोन ग्रंथालये चालवली. शाळेची गरज म्हणून बारावी-डीएड परीक्षा दिल्या, कुष्ठरोगोपचार जाणून घेतले आणि दिव्यांगांसाठीचे प्रशिक्षण नागपूरच्या मीनाक्षी सरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. समविचारी विमल मुंडे त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना प्रज्ञा आणि सुमेधा अशा दोन कर्तबगार मुली आहेत.