2 POSTS
संध्या जोशी यांचे शिक्षण बी एससी, एम ए (तत्त्वज्ञान) असे झाले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान आणि योग हे आवडीचे विषय आहेत. त्या जेरुसलेम येथे भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’मध्ये 1996 साली कार्यकर्त्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी लिहिलेली ‘इस्रायलची मराठी लेकरे’ आणि ‘अग्निपूजक पारसी’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. संध्या जोशी या विविध वृत्तपत्रांतून व अन्यत्र स्फूट लेखन करत असतात. त्यांचे व्हॉट्स अॅपवर ऑडियो ग्रूप आहेत. त्यावर मुख्यत: अध्यात्म-तत्त्वज्ञानपर पुस्तकांचे वाचन चालते.