3 POSTS
श्रीकांत देवधर यांचे वास्तव्य पेणला असते. ते ‘श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळा’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून घेतले. त्यांनी त्यांच्या वडिलांचा पेण येथील मूर्तींचा कारखाना काही वर्षे चालवला. त्यांनी डेरवणसारख्या (चिपळूण) संस्थांसाठी शिल्पकाम केले आहे. त्यांनी परदेशात; तसेच, भारतात शैक्षणिक संस्था आणि म्युझियममध्ये गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या. +91-9423093202