1 POSTS
प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून हिंदी विषयात एम. ए. केले. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्यविद्यालयाची तीन वर्षांची शिष्यवृती मिळाली. प्रा. कमलाकर सोनटक्के हे दिग्दर्शक, नाट्यप्रशिक्षक व कलाप्रशासक आहेत. त्यांची महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक संचालक म्हणून 1983 साली नेमणूक झाली. त्यांनी मुंबईतील नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 1992 -98 काम केले आहे. प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी साधारण पस्तीस मराठी आणि हिंदी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. वीस ते पंचवीस नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांनी अनेक नाटकांचे हिंदी भाषेतून मराठी भाषेत आणि मराठीतून हिंदी भाषेत अनुवाद केले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्याचा ‘कलापुरस्कार’ आणि ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9821463703