1 POSTS
प्रा. शंकर कृष्णा जोगी भारताच्या नाथप्रेमींना जोडणारे माध्यम होते. ते काही महिन्यांपूर्वीच वारले. ते अनेक वर्षे प्राथमिक शिक्षक होते नंतर प्राध्यापक झाले. ते सोलापूर जिल्ह्यातील कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांना त्यांच्या त्या प्रवासात नाथ संप्रदायाचे महात्म्य ध्यानी आले आणि नाथ तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार हे त्यांचे जीवनध्येय बनले. त्यांनी पीएच डी प्राप्त केली तीदेखील गोरक्षनाथ व ज्ञानेश्वर यांच्या तुलनात्मक अभ्यासावर !