शुभांगी पाटील-गुरव यांनी कला शाखेत पदवी घेतली. त्या पत्रकार म्हणून 2009 पासून काम करतात. त्या साप्ताहिक वार्तादीप, गावकरी, पुण्यनगरी आणि मागील दहा वर्षांपासून ‘दैनिक सकाळ’मध्ये बातमीदार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर त्यात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या एकोणतीस गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. पण या सगळ्या गावांना मनोरंजक इतिहास आहे. तेथे झालेल्या आंदोलनांचा, सामाजिक चळवळींचा, मंदिरांचा आणि गडकिल्ल्यांचा वारसा आहे.
यातल्या आग्रोली आणि बेलापूर या वैशिष्ट्यपूर्ण गावांविषयी लिहित आहेत शुभांगी पाटील-गुरव...
नव्या मुंबईतील ‘करावे’ नावाच्या गावात तांडेल कुटुंबाचा तब्बल चाळीस खोल्यांचा वाडा आहे. सन 1770 च्या सुमारास बांधलेल्या ह्या वाड्याचे सागवानी लाकडाचे बांधकाम सुस्थितीत आहे आणि वाडा नांदता आहे. तेथे पूर्वीइतकी माणसे रहात नसली तरी सामाजिक, धार्मिक उत्सव उत्साहाने साजरे होतात. एकत्र कुटुंबपद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेऊनही चार पिढ्या लोटल्या आहेत, तरीही समाजमनाला एकत्र कुटुंब पद्धतीचे एक सुप्त आकर्षण आहे. जुन्या देशी बांधकामाचा नमुना म्हणूनही ह्या वाड्याचे महत्त्व आहे आणि म्हणून तो जतन करणेही आवश्यक आहे...