श्रुती भातखंडे
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची ‘निबंधमाला’(Vishnushastri Chiplunkar’s Nibandhamala)
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’स महत्त्वाचे स्थान मराठी वाङ्मय व साहित्य यांच्या इतिहासात आणि एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या क्षेत्रात आहे. त्या ‘निबंधमाले’ने महाराष्ट्रातील विचारांना नवी दिशा व वळण दिले. ‘निबंधमाला’ नावाचे नियतकालिक होते. नियतकालिकांचा उदय ही त्या काळातील क्रांतिकारक घटना होय...
तानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman...
तानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते ! महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, "त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल !"
गोपाळकृष्ण गोखले- व्यक्ती व संस्थापक (Gopal Krishna Gokhale – Thinker among freedom fighters)
गोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ,
राज्यघटनेची पूर्वतयारी अशी झाली! (Steps to India’s Constitution During British Rule)
भारताची राज्यघटना ही अनेक स्थित्यंतरांतून विकास पावत गेली आहे. ती उदय पावली, ब्रिटिशांशी झालेल्या संघर्षातून. तिचे स्वरूप आकार घेऊ लागले एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि तेव्हाच, ती संसदीय लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागली.