2 POSTS
शशिकांत दत्तात्रय ओहळे हे पत्रकार. त्यांनी लोकसत्ता-तरुण भारत-युगधर्म या मराठी-हिंदी व ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकांत अमरावती येथील वार्ताहर म्हणून काम केले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळी, शेतकरी संघटनेची आंदोलने, जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र विदर्भ आंदोलन, कृषी विद्यापीठाची चळवळ अशा ठळक घटना त्यांच्या वार्तांकनाच्या केंद्रस्थानी राहिल्या. त्यांनी ‘परिवर्तन समाचार’ या स्वत:च्या दैनिकात अग्रलेखही लिहिले (1998). वऱ्हाड प्रांतातील ब्रिटिश राजवटीतील कारभार, स्वातंत्र्य चळवळ; तसेच, संस्थानांचे विलिनीकरण आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय इतिहास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.