Home Authors Posts by माधुरी शानभाग

माधुरी शानभाग

1 POSTS 0 COMMENTS
माधुरी शानबाग या पेशाने प्राध्‍यापक. त्‍यांनी १९७७ ते २०१२ पर्यंत बेळगाव येथील गोविन्दराम सक्सेरिया सायन्स (वरिष्ठ) महाविद्यालय येथे फिजिक्स हा विषय शिकवला. त्‍यानंतर त्या २००७ ते २०१२ पर्यंत प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. त्‍या कालावधीत त्‍यांच्‍या कॉलेजला नॅक या युजीसीप्रणित संस्थेकडुन ’ए’ ग्रेड मानांकन तसेच ’कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स’ हा गौरव प्राप्‍त झाला. त्‍या राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, या नव्या विद्यापीठात अनेक कमिट्यावर सदस्य राहिल्‍या आहेत. परिक्षा मूल्यांकन कॅम्पच्‍या प्रमुखपदासोबत विद्यापीठाच्या फिजिक्स सिलॅबस कमिटीवर त्‍यांनी काम केले आहे. त्‍यांनी बेळगाव, कोल्हापुर, सांगली, मिरज, कोकण परिसरात अनेक कॉलेजमधून नॅक मूल्यमापन पध्दतीवर व्याख्याने दिली आहेत. त्‍यांचा अनेक शैक्षणिक, तसेच फिजिक्स विषयक परिषदांमध्‍ये सहभाग होता. माधुरी शानभाग यांनी कथासंग्रह, विज्ञानकथा, कादंबरी, चरित्रलेखन, ललित लेखसंग्रह, अनुवाद, बालसाहित्य अशा विविध विषयांवर लिहिलेली छत्‍तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍या नियत‍कालिकांमधून सदर लेखन, स्फुट लेखन, मराठी अन इंग्लिश पुस्तक परिचय लेख, ललितलेख, प्रवासवर्णनपर लेख असे लेखन करत असतात. त्‍यांच्‍या पुस्‍तकांना महाराष्‍ट्र राज्‍य शासनाच्‍या पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्‍कार लाभले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 09341102832
carasole1

खगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे

पुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल...