Home Authors Posts by शमसुद्दीन तांबोळी

शमसुद्दीन तांबोळी

3 POSTS 0 COMMENTS
शमसुद्दिन तांबोळी हे ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष आणि ‘मुस्लिम सत्यशोधक पत्रिके’चे संपादक आहेत. त्यांनी समान नागरी कायदा अस्तित्वात यावा यासाठी लेखन आणि लोकशिक्षण केले आहे. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक विषयावर बारा पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे. ते हमीद दलवाई स्टडी सर्कल चालवतात. समाजात वैज्ञानिक मनोभाव व विवेकवाद रुजणे हा स्टडी सर्कलचा हेतू आहे. ते बकरी ईद निमित्त राज्यव्यापी रक्तदान सप्ताह अभियानाचे आयोजन करतात.

हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Hamid Dalwai, the Founder Of Muslim Reformists Movement)

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना पुण्यातील ‘साधना’ साप्ताहिकाच्या आंतरभारती सभागृहात 22 मार्च 1970 रोजी झाली. ‘साधना’ साप्ताहिक हमीद दलवाई आणि ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ यांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभे राहिले आहे. हमीद दलवाई यांना ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’च्या स्थापनेनंतर कार्य करण्यासाठी मोजून पाच-सात वर्षे मिळाली. दलवाई यांचे निधन अकाली, 3 मे 1977 रोजी झाले. यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर हे ‘साधने’चे जुने आणि विद्यमान संपादक विनोद शिरसाट यांनी दलवाई व मंडळ यांच्यासाठी गेल्या पाच दशकांत केलेले कार्य मोठे व महत्त्वपूर्ण आहे...

मुस्लिम लोकसंख्यावाढीची समीकरणे

लेखकाने इस्लाम हा कुटुंबनियोजनाचे केवळ समर्थन करत नाही, तर इस्लामनेच मर्यादित कुटुंबाचा आदर्श सर्वप्रथम दाखवून दिला आणि इस्लाम हाच त्या संकल्पनेचा आरंभकर्ता आहे असे म्हटले आहे व त्याचा तपशील दिला आहे...

तत्त्ववेत्ता अ.भि. शहा (A. B. Shah – Reformist, Philosopher)

भारतीय समाजात सेक्युलर आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्याची मोहीम साठ-सत्तरच्या दशकात जोर धरू लागली. मोजक्या व्यक्ती, संस्था आणि संघटना त्यासाठी कार्यरत होत्या. त्यांत प्रा.अ.भि. शहा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांची ओळख इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक किंवा सोसायटीमार्फत चालवल्या गेलेल्या नियतकालिकांचे लेखक-संपादक यांपुरती मर्यादित नाही.