1 POSTS
डॉ. संगीता बर्वे या वैद्यकीय व लेखनातून सामाजिक काम करणाऱ्या कवयित्री, गीतकार व बालसाहित्यकार आहेत. त्या आयुर्वेदशास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांनी लग्नानंतर संसार, मुली, दवाखाना सांभाळून एम ए मराठी बहिस्थ पदवी मिळवली. त्यांनी बावीस वर्षे झोपडपट्टी भागात वैद्यकीय सेवा केली. त्या काळात रुग्णांसाठी शिबीरे भरवली. तेथील स्त्रियांना कामे मिळवून दिली. त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत शाळांपासून, खेड्यापाड्यातील आजूबाजूच्या शाळांमधून जाऊन मुलांशी बोलून त्यांना लेखनप्रवृत केले आणि वाचनसंस्कृती वाढवण्याचे काम केले.