1 POSTS
सलील कुळकर्णी यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे शालेय शिक्षण मराठी शाळेतून झाले. त्यांनी आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत नोकरी केली. त्यांना मराठी आणि संस्कृत भाषांची आवड. त्यांनी संस्कृतवरील प्रेमामुळे संस्कृत विषयात बी ए आणि एम ए केले. त्यांनी मराठीतून अंतर्नाद व इतर मासिकांत, तसेच विविध वर्तमानपत्रांत आणि अनुदिनी या ब्लॉगवर लेखन केले.