सचिन सुभाष भगत हे फलटण तालुक्यातील शिंदेवाडी या गावी राहतात. त्यांचा व्यवसाय शेती हा आहे. त्यांना लहानपणापासून ऐतिहासिक नाण्यांबद्दल आकर्षण आहे. त्याचेच रूपांतर पुढे छंदात झाले. ते पदवीधर आहेत.
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...