1 POSTS
सचिन बेंडभर पाटील हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात पिंपळे जगतात या गावी राहतात. ते हवेली तालुक्यात वढू खुर्द येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी बालसाहित्यावर आधारित लेखन केले आहे. त्यांची स्वलिखित आणि अनुवादित स्वरूपात तीस पेक्षा जास्त पुस्तके प्रसिध्द आहेत. ते साहित्य अकादमीच्या वतीने देशात विविध ठिकाणी व्याख्यानांसाठी गेले आहेत. त्यांनी ‘मनातल्या कविता’ आणि ‘शिंपल्यातले मोती’ या कवितासंग्रहांचे संपादन केले. त्यांना 'संत व समाजसुधारक प्रचार व प्रबोधन केंद्र', पेरणे यांच्यातर्फे ‘उत्कृष्ट युवा कथालेखक पुरस्कार’ (२०१५) आणि लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्याकडून ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला अाहे.
लेखकाचा दूरध्वनी
9822999306