ऋषीकेश गंगाधरराव देशमुख
नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the...
कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली.