1 POSTS
रिचर्ड नुनीस हे शैलीदार ललित लेखक असून कथा, कविता, खुसखुशीत एकांकिका हे त्यांचे आवडीचे लेखन प्रांत आहेत. ते मूळचे वसईचे. त्यांचे कामानिमित्त पस्तीस वर्षे परदेशात वास्तव्य (सध्या ऑस्ट्रेलियामध्ये) आहे. ते पेशाने सनदी लेखापाल आहेत. त्यांनी पालघर-वसई परिसरात बोलल्या जाणाऱ्या वाडवळी बोलीवर लिहिलेला ‘वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्तीशोध’ हा ग्रंथ प्रकाशित आहे.