1 POSTS
रमेश खरमाळे हे पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यातील खोडद या गावी राहतात. ते एकोणपन्नास वर्षांचे आहेत. रमेश महाराष्ट्र सरकारात वनरक्षक आहेत. त्यांची आरंभीची सतरा वर्षे भारतीय सैन्यदलात गेली. वनरक्षक म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर त्यांचा उरलेला सर्व वेळ सार्वजनिक कार्यात जातो. ते गरजूंना मदत करतात, दिव्यांगांसाठी-आजाऱ्यांसाठी लक्षावधी रुपयांचा निधी उभा करून देतात. त्यांचे ‘फेसबुक पेज’ तशा कथाकहाण्यांनी भरून गेले आहे.