1 POSTS
रजनीश रमाकांत जोशी हे सोलापूरचे पत्रकार. त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. त्यांची तेरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी नऊ नाटके व अठरा एकांकिका लिहिल्या आहेत. त्याखेरीज त्यांनी नांदेड व सोलापूर आकाशवाणीसाठी नभोनाट्ये, श्रुतिका लेखन, माहितीपटांचे लेखन, स्तंभलेखन, साप्ताहिक चित्रलेखा, डाऊन टू अर्थसाठी रिपोर्ताज्, प्रबंध लेखन, रंगमंचीय कार्यक्रमांसाठी संहिता लेखन केले आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आकाशवाणीवर जलजागर या मालिकेमधून जिल्ह्यातील 1580 गावांतील भू-जल, पाऊस आणि भूपृष्ठ जलाविषयी माहिती देतात.