1 POSTS
राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी 'मोटार जगत’ नावाचे मासिक 1997 साली सुरू केले, ते आता ‘इंटरनेट’वर चालते. तसेच, ‘कोकणी माणूस’ नावाचे विचारप्रवर्तक साप्ताहिक तीन वर्षें चालवले. त्यांचे ‘कन्साइज बायोग्राफिकल डिक्शनरी ऑफ एमिनंट मराठी पर्सनॅलिटी’ या इंग्रजी ग्रंथाचे - दोनशे वर्षांतील प्रमुख मराठी माणसांचा चरित्रकोश याचे लेखन चालू आहे ! ‘कोकण क्रॉनिकल’ नावाच्या ब्लॉगचे प्रासंगिक लेखन त्यांच्याकडून होत असते. त्यांनी धनंजय कीर यांच्या टिळक चरित्राचे मराठी भाषांतर केले आणि खुद्द कीर यांचीच इंग्रजी-मराठीत चरित्रे लिहिली. ते पावस-रत्नागिरीजवळच्या गोळप या गावी राहतात.