Home Authors Posts by राजा दांडेकर

राजा दांडेकर

1 POSTS 0 COMMENTS
राजा दांडेकर यांनी पुण्यात बीएएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक व वैद्यकीय या क्षेत्रांत ठरवून चिखलगाव येथे काम करण्याचे ठरवले. प्रयोगशील शिक्षिका रेणू दांडेकर या त्यांच्या पत्नी. त्या दोघांनी ‘आदर्श शाळा व आदर्श शिक्षणपद्धत’ चिखलगावातील शाळेद्वारे नावारूपाला आणली आहे. त्यांचे 'कार्यकर्ता' हे आत्मकथन आणि 'लोकमाता नर्मदा एक शोधयात्रा' ही पुस्तके प्रसिद्धीच्या वाटेवर आहेत.

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...