Home Authors Posts by पृथ्वीराज तौर

पृथ्वीराज तौर

1 POSTS 0 COMMENTS
पृथ्वीराज भास्करराव तौर हे नांदेडला राहतात. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभागात कार्यरत आहेत. तौर यांचा 'गाव आणि शहराच्या मधोमध' हा कवितासंग्रह 2013 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी 'सृजनपंख', 'नाट्यवैभव', 'मराठी शाहिरी कविता', यांसारखी अनेक पुस्तके संपादित केली आहेत. तसेच त्यांचे 'बसराची ग्रंथपाल' (जेनीट विंटर), 'जादूच्या बिया' (मित्सुमासा एनो), 'संयुक्त राष्ट्राची तीन वचने तुमच्यासाठी' (मनरो लीफ), 'होरपळलेल्या माणूसकीची कविता' (जमातवाद विरोधी कविता), 'जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी' (जपानी कथांचे अनुवाद) असे बरेच अनुवादित साहित्य प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज तौर 'सक्षम समीक्षा' (पुणे), 'आमची श्रीवाणी' (धुळे), 'रुजुवात' (लातुर) या शोधनियतकालिकांच्या संपादक मंदळाचे सदस्य आहेत. त्यांनी 'दिव्य मराठी', 'पुण्यनगरी', 'सकाळ' या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तौर पीएच.डी., एम. फील आहेत. ते त्या अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शनदेखील करतात.
_Samajmadhyam_Aani_Mi_1.jpg

समाजमाध्यमे आणि मी

लेखन आणि संगणक या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात एकाच वेळी आल्या. मी पहिली कविता इयत्ता सहावीत असताना लिहिली. संगणक त्याच वर्षी शाळेत आले. ती...