1 POSTS
प्रतिमा जोशी या महाराष्ट्र टाइम्सच्या माजी पत्रकार आहेत. त्या सामाजिक प्रश्नांवर सक्रिय असलेल्या मराठी कथाकार आहेत. त्यांना पत्रकारितेकरता आणि लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघासह अन्य राज्यस्तरीय मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्या 'पुरोगामी सत्यशोधक' या त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक आहेत. त्या देवदासी-शरीरविक्रय करणाऱ्या महिला, मुले व व्यक्ती यांच्याकरता दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन, दलित अत्याचार, असंघटित कामगार, सफाई कामगार, एकल महिला यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांशी जोडलेल्या आहेत. त्या मुंबईत राहतात.