1 POSTS
प्रतिभा सराफ या देवनार, मुंबई येथील रहिवासी. त्यांनी एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), बी. एड. (विज्ञान)चे शिक्षण घेतले आहे. त्या भौतिकशास्त्राच्या व्याख्यात्या आहेत. त्यांचा परिचय कवयित्री म्हणून अधिक आहे. त्यांची ‘मात्र एक नाही’, ‘मातीत पूर्णत्वानं रुजण्यापुर्वी’ हे काव्यसंग्रह, ‘दु:ख माझे कोवळे’ (गझलसंग्रह), ‘माझा कुणीतरी’ (ललित लेखसंग्रह), ‘सलग पाच दिवस’ (कथासंग्रह) व ‘कादंबरी जगताना’ (कादंबरी) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सराफ यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘आश्वासक नवोदित साहित्यिक पुरस्कार’, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा ‘वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार’ यासह चौतीस विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
98925 32795