1 POSTS
प्रा. डॉ. नरेंद्र सदाशिव कुंटे यांचा जन्म सोलापूरच्या जमखंडी गावातला. त्यांनी एम.ए. पीएच. डी पूर्ण करताना 'चिं. त्र्यं. खानोलकरांची कविता कादंबरी' या विषयावर प्रबंध लिहीला. कुंटे हे १९७१ ते १९८० या काळात अक्कलकोट महाविद्यालयामध्ये शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी १९८० ते २००५ पर्यंत सोलापूरच्या 'दयानंद कला व शास्त्र' या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख पदावर काम केले.
नरेंद्र कुंटे यांनी १९६३ ते १९७० या काळात दैनिक 'संचार' आणि दैनिक 'समाचार'मध्ये पत्रकारिता केली. ते वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन करतात. ते संतवाङ्मावर लेखन करण्यासोबत व्याख्याने व प्रवचने देतात. कुंटे यांना 'देवर्षि नारद' पुरस्कार, 'डॉ. मु.श्री. कानडे' पुरस्कार, 'अनुबंधी' पुरस्कार, 'श्रीदत्तरत्न' पुरस्कार, 'गांधी फोरम'चा 'समाजसेवा' पुरस्कार, 'चरण प्रसाद' पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत.