Home Authors Posts by नितेश शिंदे

नितेश शिंदे

91 POSTS 0 COMMENTS
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.
-heading

म्हाईंभट यांचे लीळाचरित्र

म्हाईंभट उर्फ महेंद्रभट नगर जिल्ह्यातील सराळे गावचा ब्राह्मण होता. तो खूप श्रीमंत व विद्वान होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा गर्व होता. गणपती आपयो...

सोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली 'क्यूआर कोड' पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015 पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची...
दिपा कदम

प्रशासनाची बेफिकिरी, औदासीन्य आणि जनतेची हताशता !

निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रे वाचू नयेत व दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या पाहू नयेत असे वाटते, इतकी ती माध्यमे खऱ्या खोट्या, बऱ्या वाईट प्रचाराने बरबटलेली असतात. त्यात समाजमाध्यमे आल्याने गोंधळ, गलबला आणखीच वाढतो. पण तशातही काही लेखन मनाला भिडते, मन प्रक्षुब्ध करते. तसेच एक सदर दीपा कदम नावाची तरुण-तडफदार पत्रकार ‘सकाळ’च्या रोजच्या अंकात लिहिते. खरे तर, तो आँखो देखा हाल वर्णन करून सांगितलेला असतो. दीपा कदम निवडणूक काळात विदर्भातील गावोगावी फिरत आहेत व तेथून रोज एक प्रसंगचित्र शब्दांकित करून पाठवतात. त्यामधून राजकीय नेत्यांची बेफिकिरी, प्रशासनाचे क्रूर वाटावे असे औदासीन्य आणि जनसामान्यांची हताशता प्रकट होते. जनता अधिकाधिक परावलंबी होत चालली आहे आणि राजकारण्यांना तेच हवे आहे. त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत...

पगडी (Turban)

विशिष्ट पद्धतीने कायम बांधून ठेवलेल्या बसक्या पागोट्याला पगडी असे म्हणतात. त्यासाठी नऊ इंच रुंद व वीस ते पंचवीस वार लांब तलम सुती किंवा रेशमी,...

पखवाज

पखवाज हे पक्षवाद्य किंवा पक्षतोद्य या संस्कृत शब्दांचे अपभ्रष्ट रूप आहे. त्यास प्राचीन काळी पुष्करवाद्य म्हणत. पखवाज हे लाकडाचा आणि पिंपाच्या आकाराचे बनवतात....

पागोटे

पागोटे हे लांबलचक वस्त्र असते; म्हणजे कापडी पट्टाच तो. पागोटे डोक्याला गुंडाळतात. वस्त्र मस्तकाभोवती नुसते गोलाकार गुंडाळलेले असते. त्यालाच पटका, फेटा, रुमाल, साफा, कोशा,...

मूकनायकची शताब्दी (Mooknayak)

0
‘मूकनायक’ हे बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी चालवलेले मराठी भाषेतील पाक्षिक होते. ‘मूकनायक’चा पहिला अंक 31 जानेवारी 1920...
_chitrakalet_maharashtra_1.jpg

चित्रकलेत महाराष्ट्र मागास!

‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे...
_vidyarthyanchya_nirmitikshamatela_1_0.jpg

विद्यार्थ्यांच्या निर्मितिक्षमतेला आवाहन – प्रेरणाचा प्रयत्न

0
प्रेरणा धारप आणि त्यांची अकरावीत असलेली मुलगी नक्षत्रा यांचे नाते वेगळे आहे. म्हणजे त्या मायलेकी तर आहेतच; पण प्रेरणा या नक्षत्राची मैत्रीण आहेत आणि...
_Rajul_Vasa_1.jpg

वासा कन्सेप्ट – परावलंबनातून स्वावलंबनाकडे!

0
डॉ. राजुल वासा यांची ‘वासा कन्सेप्ट’ ही अनोखी उपचार पद्धत आहे. ती पॅरेलिसीस, सेरेब्रल पाल्सी, स्पायनल इन्ज्युरी व ब्रेन इन्ज्युरी अशा कारणांमुळे परावलंबी जीवन...