नितेश शिंदे
साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...
अनंत फंदी (Anant Fandi)
अनंत फंदी हे संगमनेरचे. पूर्वजांचा धंदा सफारीचा, गोंधळीपणाचा, भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला. तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! ‘फंदी अनंत कवनाचा सागर’ असे त्या...
सुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)
वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका,...
साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे...
विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?
उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने वसईच्या फादर कोरिया यांना भेटण्याचा योग आला. कोरिया हे दिब्रिटो यांचे समकालीन, सहकारी. ते जीवनदर्शन केंद्राच्या (वसई) मासिकाचे संपादक आहेत. ते स्वतः लेखक-संशोधक आहेत. त्यांच्या भेटीमुळे मला त्या वादासंबंधातील एक चर्चाही ऐकण्यास मिळाली. त्यामुळे माझा योगायोगाने त्या वादाशी संबंध आला आणि मला त्यावर हसावे की रडावे हे कळेना...
नाथ संप्रदाय व त्याचा प्रभाव
नाथ संप्रदाय हा भारतातील प्राचीन लोकप्रिय असा धर्मपंथ आहे. तो मध्ययुगीन उपासना पंथ आहे. नाथसंप्रदायाचे महत्त्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अनन्यसाधारण आहे. नाथपंथाचा प्रभाव महाराष्ट्रातील...
केकावली (Kekavali)
‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...
अमृतानुभव (Amrutanubhav)
ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतर वेदांतावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याच्या उद्देशाने अमृतानुभावाची निर्मिती झाली. त्या ग्रंथात दहा प्रकरणे असून आठशेचार ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यांचा आवडता...