Home Authors Posts by निरंजन घाटे

निरंजन घाटे

1 POSTS 0 COMMENTS
निरंजन घाटे आणि विज्ञानविषयक भरपूर आणि सोपी माहिती असणारी पुस्तके हे समीकरण वाचकांच्या मनात पक्के झाले आहे. निरंजन घाटे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विभागात उच्च शिक्षण घेतले. 1968 ते 1977 या काळात त्यांनी पुणे विद्यापीठात प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून काम केले आहे. नोव्हेंबर 1977 पासून जवळजवळ सहा वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कार्यक्रम अधिकारी या नात्याने सहाशे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे ते उपसंचालक व नंतर संचालक होते. आता ते पूर्ण वेळ लेखन करतात. सृष्टिज्ञान, बुवा, ज्ञानविकास, किर्लोस्कर यांसारख्या मासिकांचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे, पुण्यातील ’ मराठी विज्ञान परिषद’, ’मराठी साहित्य परिषद’ आणि ’महात्मा फुले वस्तू संग्रहालय’ यांचे ते आजीव सदस्य आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे 1985 साली त्यांना ’उत्कृष्ट विज्ञान प्रसारक’ म्हणून मानपत्र मिळाले. त्यांनी लिहिलेल्या ’वसुंधरा’, ’एकविसावं शतक’ आणि ’नवे शतक’ या पुस्तकांना ’राज्य पुरस्कार’ मिळाले आहेत. इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे ’प्रा. डॉ. मो. वा. चिपळूणकर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेले सुमारे 3000 लेख आणि 300 कथा विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकांमधूनही त्यांनी लेखन केले आहे. मराठी विज्ञानसाहित्याचा इतिहास या विषयातील पथदर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. लेखकाचा दूरध्वनी 02024483726
_Marathi_Vidnyankatherchi_Shatsauvantari_1.jpg

मराठी विज्ञानकथेची शतसंवत्सरी

0
मराठीमध्ये विज्ञान साहित्यनिर्मितीस - म्हणजे सायन्स फिक्शनच्या लेखनास अनुवादित स्वरूपात 1900 मध्ये सुरुवात झाली. तो ज्यूल्स व्हर्नच्या 'टू द मून अँड बॅक'चा अनुवाद होता....