1 POSTS
नयना वैद्य यांचे मराठी साहित्यावर प्रेम असल्याने त्यांनी मराठी कवितांचा विशेष अभ्यास केला. त्यांनी ख्यातनाम कवींच्या कविता सादरीकरणाचे 'कविता तुमच्या माझ्या मनातल्या', 'प्रेमयोग' असे कार्यक्रम केले. त्यांनी मराठी ज्ञानपीठ विजेत्यांचे साहित्य, त्यांच्या साहित्याचा तौलनिक अभ्यास करून, एकत्र सादर करणे आणि त्यात चाळीस सुप्रसिद्ध कलाकारांना सहभागी करून घेतले. कारगील युध्दाच्यावेळी, 'कुरुक्षेत्र ते कारगील' कार्यक्रम सादर करुन, कारगील फंडाला मदत पाठवली. त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावर आणि पानिपतच्या युध्दावर अनेक लेख लिहिले. त्यांनी ठाणे शहरातील पाडव्याच्या रथयात्रेवरील विषयांवर चित्ररथ निर्माण करुन सातत्याने प्रथम क्रमांक पटकावला.