Home Authors Posts by मुकुंद कुळे

मुकुंद कुळे

2 POSTS 0 COMMENTS
मुकुंद कुळे हे व्‍यवसायाने पत्रकार. ते पंचवीस वर्षांपासून त्‍या क्षेत्रात कार्यरत आहे. ते दैनिक 'महाराष्‍ट्र टाईमस'मध्‍ये नोकरी करतात. त्‍यांना साहित्य- कला- संस्कृती यांमध्‍ये विशेष रस आहे. कुळे यांनी लिहिलेले 'पंचलावण्य' हे पहिले पुस्तक. त्‍यात महिला लावणी कलावंतांच्‍या चरित्रलेखांचे संकलन आहे. त्‍यांच्‍या 'इतिहासाचे साक्षीदार' या दुस-या पुस्तकास राज्यशासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. त्‍यांनी 'लोकरहाटी' या पुस्तकातून नामशेष होत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचा वेध घेतला आहे. ते पुस्तकही राज्यशासन पुरस्काराने गौरवण्‍यात आले. कुळे यांची इतर तीन संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍या तीनही पुस्तकांत प्रसिद्ध लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखांचे संकलन आहे. त्यांची नावे अनुक्रमे 'कायमचे प्रश्न', 'रंग-रुप' आणि 'रस-गंध' अशी आहेत. कुळे यांचा लोकसाहित्य हा आवडीचा विषय. त्‍यांचे गेली काही वर्षे तत्संबंधीचे संशोधन सुरू आहे. त्‍यांनी त्या विषयावर आधारित लेख विविध परिसंवादांत वाचले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9769982424
_Lavani_1.jpg

लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे

2
महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी...
carasole

नात्यांतला ओलावा जपणारा शेवगा

1
आता शेवग्याच्या शेंगा बारमाही मिळतात. हव्या तेव्हा आणून त्या सांबार पिठल्यात टाकता येतात आणि त्याचा चवीने तृप्त झाल्याचे भावही आळवता येतात... पण तरीही शेवग्याच्या...