मिलिंद परांजपे हे निवृत्त ‘मास्टर मरीनर’ आहेत. त्यांनी ‘Ramblings of Sea-Life’ हे समुद्र जीवनावरील अनुभवांचे पुस्तक लिहिले आहे. ते वृत्तपत्रे, मासिके आणि जर्नल्समध्ये लेखन करतात. ते पुण्यात राहतात.
वेस्ट इंडिजमधील गायाना, त्रिनिदाद हे देश भारतीय लोकांना क्रिकेटमुळे परिचित आहेत. व्ही. एस. (विद्याधर सुरजप्रसाद) नायपॉल हे मूळ भारतीय होते. ते त्रिनिदादचे नोबेल विजेते लेखक होते. त्यांची पुस्तके भारतात विशेष लोकप्रिय झाली होती. मागील पिढीतील क्रिकेटचे फिरकी गोलंदाज सुभाष गुप्ते हेदेखील त्रिनिदादमध्ये स्थायिक झाले होते. छेदी जगन हे गायानाचे पहिले पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे होते...
तुर्कस्थानच्या ऑटोमन साम्राज्यात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घटनात्मक लोकशाहीसाठी राजकीय सुधारणांच्या मागणीकरता तरुण तुर्कांची (यंग टर्क्स) चळवळ सुरू झाली.