1 POSTS
मीना देवल या ‘स्त्री उवाच’ चळवळीच्या संस्थापक सदस्य होत्या. त्यांचे मूळ शिक्षण विज्ञानातील. त्या भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यरत होत्या. त्यानंतर त्या फॅमिली प्लानिंग असोसिएशनच्या वंध्यत्व निवारण केंद्रात समुपदेशकही होत्या. त्या नोकरी करत असताना ‘स्त्री मुक्ती चळवळी’त 1978 मध्ये सक्रिय झाल्या. त्यांनी ‘मुलगी झाली हो’ या पथनाट्यात सुमारे दोनशे प्रयोगांमध्ये सूत्रधाराचे काम केले. त्यांना लिहिण्याची आवड होती. त्यांचे ‘माझे किहीम’ हे आत्मचरित्रपर पुस्तक विशेष गाजले. त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी लेखन केले. त्यांचे 'मिळून साऱ्याजणी' मासिकामधील लेखही लोकप्रिय ठरले.