कै. मीना देवल
ज्ञानकमळ रांगोळी (Dnyankamal Rangoli)
ज्ञानकमळ नावाची एक रांगोळी प्रसिध्द आहे. त्या रांगोळीच्या मागे अंधश्रध्दा अशी होती, की ग्रहणाच्या काळात ज्ञानकमळ काढण्यास शिकले, की बुध्दी वाढते ! मी एका ग्रहणकाळातच ज्ञानकमळ रेखाटण्यास शिकले. या रांगोळीसाठी गणिती तत्त्व (मॅथेमॅटिकल फॉर्म्युला) वापरला जातो. मी माझे बालपण संपल्यानंतर कित्येक वर्षांत ते ज्ञानकमळ काढले नाही, पण तरी संख्यांचा तो क्रम पक्का डोक्यात बसला. शेकडो वर्षांपूर्वी कोणातरी पणजी वा खापरपणजीने हा क्रम ठरवून ज्ञानकमळाची रचना केली असणार, तिला संख्याज्ञान असेल का? की फक्त 1 ते 10 आकडे मोजता येत असतील? असे प्रश्न माझ्या मनात अनेकदा उठले...