Home Authors Posts by मनीषा बाठे

मनीषा बाठे

1 POSTS 0 COMMENTS
मनीषा बाठे या लेखक-संशोधक. त्या समर्थ रामदास यांच्याबद्दल गेली पंधरा वर्षे सातत्याने संशोधन करत आहेत. मनीषा यांची एकूण प्रसिद्ध पुस्तके दहा आहेत. त्या समर्थ मीडिया सेंटर नावाची प्रकाशन संस्था बहीण आशा बाठे यांच्यासमवेत चालवतात. त्यांना अकरा भारतीय भाषा लिहिता व वाचता येतात. त्यांनी त्या भाषांमध्ये विविध राज्यांतील पदव्युत्तर शिक्षण व पदविकाही संपादित केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला आहे. त्या महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेच्या आजीवन सदस्य आहेत. त्यांनी ‘गाथा क्रीडातपस्वीची’ या ग्रंथाचे संशोधन-लेखन केले आहे.

महिला मल्लखांबाचे प्रवर्तक म.द. करमरकर (M D Karmarkar took Mallakhamb to women’s world)

0
मल्लखांब दिन 15 जून रोजी साजरा होतो. योगायोगाची बाब म्हणजे तो दिवस वैद्य म.द. करमरकर यांचा स्मृतिदिन असतो. करमरकर हे मिरजेचे. त्यांनी एक वैद्य या नात्याने महिलांना मल्लखांब शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुर्वेद संशोधनाचा तो विषय बनवला. त्यांनी स्वत:च्या सहा व चार वर्षांच्या कन्यांना आणि पत्नीला त्या प्रयोगाचा भाग बनवले ! त्यांचा तो निर्णय 1944 साली धाडसाचा होता. मिरजेसारख्या निमग्रामीण भागात पत्नीला नऊवारी पातळावर व दोन मोठ्या मुलींना शर्ट-हाफपॅण्टवर धावण्याच्या सरावास सोडणे, त्यांच्या आहारावर काटेकोर लक्ष ठेवत - त्यांचा चहा बंद करून त्यांचे दूध पिण्याचे प्रमाण वाढवणे...